आज शाळेचा पहिला दिवस, first day of school

आज शाळेचा पहिला दिवस

आज शाळेचा पहिला दिवस

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यभरातील बहुतेक शाळा आजपासून सुरू होत आहेत.

लहानग्यांची शाळेत जाण्याची लगबग आजपासून सुरू झाली आहे. आजपासून शाळेची घंटा पुन्हा कानावर येणार आहे.

नवीन पुस्तकं, कपडे, नवी स्कूल बॅग शाळेच्या पहिल्या दिवसासाठी तयार आहेत.

आजपासून रस्त्यावर स्कूल बसची वाट पाहणारे विद्यार्थी दिसून येतायत.

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्येही शाळेच्या पहिल्या दिवसाची लगबग दिसून येत आहे.

एकंदरीत प्रत्येकाच्या आयुष्यात आठवणींची ठेव असलेला शाळेचा पहिला दिवस आजपासून सुरू होत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 16, 2014, 08:17


comments powered by Disqus