बैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही - उद्धव, sena called emergency meeting

बैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही

बैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही
www.24taas.com, मुंबई


शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदार आणि खासदारांची शिवसेना भवनात बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, शिवसेनाप्रमुख आणि आजच्या बैठकीचा संबंध नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुखांची श्रद्धा ही आई जगदंबेवर आहे, आई जगदंबेच्या कृपेने विरोधकांना जसे वाटते तशी परिस्थिती नाही आहे, लवकरच शिवसेनाप्रमुख सर्वांना रोखठोक उत्तर देतील, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुखांना अनेक मान्यवर भेट देत आहेत, त्यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत त्याबद्दल बोलताना उद्धव म्हणाले, बाळासाहेबांना देव मानणाऱ्या शिवसैनिकांना आपल्या प्राणाहून प्रिय हे शिवसेनाप्रमुख आहेत. त्यांनाही काळजी आणि चिंता आहे. कालच राज ठाकरे, छगन भुजबळ आणि इतर मान्यवर भेट देऊन गेले, आज सकाळी राजने फोन केला. सर्वांनाच बाळासाहेबांची चिंता आहे, ही चिंता त्यांच्यावरच्या प्रेमापोटी असल्याचेही उद्धव यांनी सांगितले.

First Published: Friday, November 2, 2012, 14:41


comments powered by Disqus