Last Updated: Saturday, August 24, 2013, 13:09
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई राजकीय छायाचित्रकार गजानन घुर्ये (५८) यांनी मुंबईतील दादर शिवाजी पार्क जवळील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांनी पंख्याला गळफास लावून ही आत्महत्या केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी. कुलकर्णी यांनी दिली.
घुर्ये हे मध्य मुंबईतील साई चरण अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर कुटुंबासह राहत होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आजाराला कंटाळून ही आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
ते मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यीतल वेंगुर्ल्याचे. त्यांनी आपले शिक्षण मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये घेतले. त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली होती. ते ज्येष्ठ छायाचित्रकार होते. त्यांचा स्वतंत्र फोटोग्राफीचा व्यवसाय करीत होते. ते राजकीय फोटोग्राफर म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आजारामुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांनी स्पष्ट केलंय.
आत्महत्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. नोंदविण्यात आलाय. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, August 24, 2013, 12:54