Last Updated: Thursday, September 13, 2012, 13:00
www.24taas.com,मुंबईबनावट शस्त्र परवान्यासह मुंबईत राहून बेकायदेशीररीत्या सुरक्षा रक्षकांचे काम करणाऱ्या सहा बिहारी आणि एका झारखंडच्या व्यक्तीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बिहारमधील लोकांचा छुपा धंदा उघड झाला आहे.
बनावट शस्त्र परवान्यासह मुंबईत राहून बेकायदेशीररीत्या सुरक्षा रक्षकांचे काम हे लोक करीत होते. सहा बिहारी व एका झारखंडच्या व्यक्तीला कुर्ला रेल्वे पोलिसांनी गजाआड केले आहे. या सातही आरोपींकडून बारा बोअरच्या ८ फॅक्ट्रीमेड रायफली, ७ जिवंत काडतुसे, २७ बनावट शस्त्र परवाना तसेच बिहार व झारखंड राज्याच्या ड्रिस्ट्रिक्ट आर्म्स मॅजिस्ट्रेटचे राजमुद्रित स्टॅम्प जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक मंगळवारी कुर्ला टर्मिनस येथे गस्त घालत असताना भरत सिंग (३६) हा दोन बॅगांसह संशयास्पदरीत्या आढळून आला. चौकशी केली असता त्याच्याकडे त्याच्याच नावाचे गोपालगंज डिस्ट्रिक्ट आर्म्स मॅजिस्ट्रेटने दिलेले दोन शस्त्र परवाने, तीन जिवंत काडतुसे व रबरी स्टॅम्प सापडले. शस्त्र परवाना बनावट असल्याचे निष्पन्न होताच अधिक चौकशी केल्यानंतर ही बाब उघड झाली.
उमा शंकर सिंग आणि अनिलकुमार याच्याकडून हे शस्त्र परवाना व काडतुसे घेतल्याचे भरतने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी कुर्ला येथील संभाजीनगरात राहणार्यात उमाशंकर व अनिलकुमार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बनावट परवाना, जिवंत काडतुसे व रायफल हस्तगत करण्यात केली.
अमरेंदर कुमार सिंग, उमाशंकर घनश्याम सिंग, परमानंद सिंग, अनिलकुमार सिंग (सर्व बिहार) व अर्जुनसिंग (झारखंड) यांनाही अटक केली. या आरोपींकडून कोरे व नोंदी असलेले २७ बनावट शस्त्र परवाना जप्त करण्यात आल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त प्रभात कुमार यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेले कर्नल (कांदिवली), सॉलिड सोलूशन (विक्रोळी), गुरू (घाटकोपर) आणि २४ गुरू (विक्रोळी) या सुरक्षा एजन्सीकडे सुरक्षा रक्षकाचे काम करीत होते.
First Published: Thursday, September 13, 2012, 12:31