Last Updated: Tuesday, September 18, 2012, 10:05
www.24taas.com, मुंबईसुप्रसिद्ध पंजाबी साहित्यिक दिवंगत अमृता प्रीतम यांचा मुलगा नवराज क्वात्रा यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये हत्या झाली. नवराज क्वात्रा फिल्म फायनान्सर होते. नवराज यांच्या हत्येचं रहस्य अद्याप उलगडलं नसलं, तरी पोलीस तपासणीत क्वात्रांच्या घरात अनेक आक्षेपार्ह गोष्टी आढळल्या आहेत. यामुळे हत्येच्या प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
६५ वर्षीय नवराज क्वात्रा यांच्या घराची पोलीस तपासणी चालू असता त्यात अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल्स यांचे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो आढळले आहेत. त्यांच्या बेडरुममध्ये ततसंच बाथरुममध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याचं आढळून आलं आहे. यामुळे नवराज यांची हत्या ब्लॅकमेलिंगमुळे झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सचे बेडरूम आणि बाथरुममध्ये आक्षेपार्ह अवस्थेतील फिल्म रेकॉर्ड करून तसंच फोटो काढून क्वात्रा त्यांना ब्लॅकमेल तर करत नव्हते ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय नवराज क्वात्रा यांच्या घरात पोलिसांना १०२ सीडी, असंख्य अश्लिल फोटो, ६०० व्हायग्राच्या गोळ्या आणि ५२ सेक्स टॉइज मिळाली. अश्लिल व्हिडिओंमध्ये सध्याच्या दोन ख्यातनाम अभिनेत्री आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आङेत. यातील एक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे, तर दुसऱ्या अभिनेत्रीने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. याशिवाय १९ विविध मॉडेल्स आणि अभिनेत्रींचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओज सापडले. पोलिसांनी या अभिनेत्री आणि मॉडेल्सची नावं जाहीर करण्यास नकार दिला आहे.
First Published: Tuesday, September 18, 2012, 10:05