Last Updated: Thursday, February 20, 2014, 08:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईस्वतःच्या पत्नीला वेश्याव्यवसायासाठी विकण्याचा घाट घालणा-या नराधम पतीला नागपाडा पोलिसांनी अटक केलीये.. या महिलेला दोन महिन्यांचे बाळ आहे.. या महिलेचा कामाठीपु-यातील वेश्यावस्तीत 40 हजार रुपयांत सौदा करण्यात आला होता.
सलाउद्दीन खान असं या आरोपीचं नाव असून तो मुळचा उत्तरप्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी आहे.. त्याच्यासह या कटात सहभागी असलेली त्याची पहिली पत्नी आस्मा खान हिलाही पोलिसांनी अटक केलीय. विशेष म्हणजे सौद्यासाठी आलेल्या आणि स्वतः वेश्यानव्यवसायात खितपत पडलेल्या महिलांनीच हा डाव उधळून लावला.
त्यांनी सलाउद्दीनला बोलण्यात गुंतवले आणि 20 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तातडीनं याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी महिला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेतलं असून त्यांना सुधारगृहात पाठवलं जाणार आहे..
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 20, 2014, 08:19