अल्पवयीन मुलावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार sexual violence : minor child and sexual violence

अल्पवयीन मुलावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलावर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतील खारघरमध्ये एका अल्पवयीन मुलावर कलिंगड विक्रेत्याने चाकूचा धाक दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

तळोजा येथे राहणारा मोहम्मद इस्माइल बोम्बे याचा कलींगड विक्रीचा व्यवसाय आहे. शनिवारी त्याने जवळच राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुलाला मदतीसाठी सोबत नेले होते. रात्री आठच्या सुमारास घरी परत येत असताना, तळोजा उड्डाणपुलाखाली टेम्पो थांबवत या मुलाला चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला.

या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीया मुलास दिली होती. मात्र घरी आल्यानंतर त्याने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. या प्रकरणी मोहम्मदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 17:25


comments powered by Disqus