Last Updated: Thursday, April 3, 2014, 21:40
24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबई सत्र न्यायालयानं गुरुवारी आयपीसीच्या एका संशोधित कलमानुसार शक्ती मिल फोटो जर्नलिस्ट तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन जणांना दोषी ठरवलंय. कायद्यानुसार, एकच गुन्हा पुन्हा पुन्हा करण्यासाठी दोषींना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
मुख्य सत्र न्यायाधीश शालिनी फनसाळकर - जोशी यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ई) नुसार(बलात्काराच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करणे) आरोपी विजय जाधव (१९ वर्ष), कासिम बंगाली (२१ वर्ष) आणि मोहम्म सलीम अन्सारी (२८ वर्ष) यांना दोषी ठरवलंय. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर कायद्यामध्ये नव्याने दुरूस्ती करण्यात आली होती. या कलमानुसार दोषी आढळल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद यात करण्यात आली आहे.
यापूर्वी, शक्ती मिल येथे मागील वर्षी जुलै महिन्यात टेलिफोन ऑपरेटर तरूणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामधील तीन आरोपी महिला पत्रकारावरील सामूहिक बलात्कारातही दोषी आढळले त्यामुळे सातत्याने हा गुन्हा केल्याचे सिद्ध झाल्याने या तीन नराधमांना फाशी होण्याची शक्यता आहे.
२२ वर्षीय फोटो जर्नालिस्ट मुलगी कामाच्या संदर्भात आपल्या एका सहकाऱ्यासोबत मध्य मुंबईस्थित शक्ती मिल परिसराकत गेली होती. इथंच विजय जाधव, कासिम बंगाली, सलीम अन्सारी, सिराज रेहमान आणि एका अल्पवयीन आरोपीनं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 3, 2014, 21:40