Last Updated: Monday, March 24, 2014, 11:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहालक्ष्मीच्या शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालय आज महत्त्वपूर्ण निकाल देणार आहे. २२ ऑगस्टला काही नराधमांनी एका फोटोजर्नलिस्टवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
दरम्यान याच चार नराधमांना टेलिफोन ऑपरेटरवर केलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावलीये. यातील आरोपींपैकी तिघांना फाशी देण्यात यावी अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यावेळी करणार आहेत.
कलम ३७६ ई नुसार दुसऱ्या खटल्यात आरोपींना फाशी झाली तर अशाप्रकारची कठोर शिक्षा झाल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण ठरणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 11:00