शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आज शिक्षा Shakti Mills gang-rape: Sentencing in photojournalist case today

मुंबईतील शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आज शिक्षा सुनावणी

मुंबईतील शक्तीमिल बलात्कार प्रकरणी आज शिक्षा सुनावणी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईच्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना कलम ३७६ ई च्या कलमाखाली दोषी ठरवण्यात आलंय. विजय जाधव, सलीम अन्सारी, कासीम बंगाली यांना या कलमा अंतर्गत दोषी ठरवण्यात आलंय. या आरोपींना आज सेशन कोर्टात शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

महालक्ष्मी येथील शक्तीमिल कंपाऊंडमध्ये एका फोटोजर्नलिस्ट वर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी या आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. यापूर्वी याच तरुणांनी एका टेलीफोन ऑपरेटरवरही सामूहिक बलात्कार केल्याचं उघडकीस आलं होतं. आता या सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होते की फाशीची शिक्षा होते याकडे आता सा-यांचं लक्ष लागलंय.

शक्तीमिल कंपाऊंडमध्ये फोटोजर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणी तीन नराधमांवर नव्यानं आरोप ठेवण्यात आले होते. यावेळी या तिघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळल्यानं सरकारी पक्षाला आरोप सिद्ध करण्यासाठी आणखी पुरावे द्यावे लागणार आहेत.

कासिम बंगाली, विजय जाधव आणि मोहम्मद अन्सारी हे या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. त्यांनी एकच गुन्हा दोन वेळा केला आहे. ते सराईत बलात्कारी आहेत त्यामुळं त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ३७६(ई) अंतर्गत आरोप ठेवण्यात यावेत, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती.

आरोपींनी हे आरोप अमान्य केले. आधी टेलिफोन ऑपरेटर आणि नंतर पत्रकार महिला अशा दोघांना शक्तीमिलच्या आवारात गँगरेपच्या भयंकर प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. यातील टेलिफोन ऑपरेटवरील बलात्कारप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं चार आरोपींना शुक्रवारी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014, 11:44


comments powered by Disqus