मुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव, Shanghai to Mumbai, rebuilding cities offer

मुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव

मुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव
www. 24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई, ठाण्यासह लगतच्या शहरांमधल्या अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय... मुंब्रा इथल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळं आता शहरांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सरकारनं तयार केलाय.

मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतल्या नगरविकास खात्यानं यावर प्रस्ताव तयार केलाय. मोडकळीस आलेल्या इमारतींचा विकास करण्याऐवजी संपूर्ण शहराचीच पुनर्बांधणीचा हा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. शांघाय शहराच्या धर्तीवर हा पुनर्बांधणीचा प्रस्ताव बनवण्यात आल्याची माहिती नगरविकास विभागातील सूत्रांकडून मिळालीय.

पुनर्बांधणीनुसार सेक्सरची आखणी करुन क्लस्टर डेव्हलपमेंटद्वारे शहरांची पुनर्बांधणी केली जाणार आहे.. यासाठी संपूर्ण प्राथमिक आराखडा आणि एमआरटीपी कायद्यातील बदलाचा प्रस्ताव नगरविकास विभागाने तयार केलाय.

मुंबईसह एमएमआर रिजनमधील सर्व शहरांसाठी पुनर्बांधणीचा हा कार्यक्रम हाती घेण्याचा सरकारचा मानस आहे. लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे.

मात्र संपूर्ण शहराच्यांच पुनर्बांधणीचा हा कार्यक्रम राबवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जबर राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. त्यांच्यांच अखत्यारितील नगरविकास विभागाने हा प्रस्ताव तयार केला असून त्याचे भवितव्य काय असेल, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 22, 2013, 19:45


comments powered by Disqus