Last Updated: Wednesday, May 21, 2014, 17:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई केंद्रातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूपीएकडून नरेंद्र मोदींशी संपर्क साधणारा मी एकमेव आहे, असा दावा केला आहे. तसेच मोदींशी माझे जवळचे संबंध असल्याचे ही पवारांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार हे लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पक्ष कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळेही होत्या. या वेळी पत्रकार परीषदेत बोलताना, पवार यांनी मोदींच्या कामांचे कौतुक केले.
पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, `देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसाचे १७ ते १८ तास काम करतात. मी देखील असंच काम करतो. मला अशा प्रकारे जास्त काम करणारी माणसं आवडतात. कुठल्याही नेत्याने असेच आघाडीवर उभं राहून काम केलं पाहिजे. मोदींसोबत तर माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. हे संबंध आजचे नाही, तर अनेक वर्षाचे आहेत. केंद्रिय कृषीमंत्री म्हणून माझा आणि मोदींचा नेहमीच संपर्क असायचा.`
विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना पवारांनी सांगितले की, ` लोकांमध्ये मतं मागताना मंत्री, आमदारांनी केलेली कामं ही लोकांपर्यंत दीड महिन्यात पोहचवा, नाही तर मग विरोधी पक्षात बसा.` असा स्पष्टपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम भरला.
यावेळी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडले.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 14:25