Last Updated: Monday, June 9, 2014, 21:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.
पराभव समोर दिसायला लागला की शरद पवार नेहमीच जातीय राजकारणाचा वापर करतात, अशा शब्दांत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.
केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राज्यात दंगली होतात हे शरद पवारांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं तावडेंनी म्हटलंय.
पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना महात्मा गांधींजींची हत्या झाली असं म्हणणं योग्य होईल का असा सवालही तावडे यांनी विचारलाय.
त्यामुळं वेळ गेलेली नाही, जातीय राजकारणाऐवजी विकासाची भाषा वापरा असंही तावडेंनी म्हटलंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 9, 2014, 21:24