शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवारSharad Pawar target Udhhav Thakre in Dombiwali

शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार

शिवसेना पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज -शरद पवार
www.zee24taas.com, झी मीडिया, डोंबिवली

ज्या पक्षाचे खासदार पक्ष सोडू जातात त्या पक्षनेतृत्वाला विचार करण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केलीय. डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपेंच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित केलाय.

आनंद परांजपे गेल्यावेळी शिवसेनेचे खासदार होते. 2009 साली शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांना दोन लाख 12 हजार मतं मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांना एक लाख 88 हजार मतं मिळाली होती. मनसेच्या उमेदवार वैशाली दरेकरांना लाखभर मतं मिळाली होती. 2014 मध्ये चित्र पालटलयं.शिवसेना सोडून परांजपे राष्ट्रवादीत दाखल झालेत आणि आता राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मतदारांना सामोरे जाताहेत.

आनंद परांजपे यांची उमेदवारी कायम असली तरी यावेळी पक्ष मात्र बदलला गेलाय. परांजपे यांनी धनुष्यबाणाची साथ सोडत घडयाळाशी केलेली संगत मतदारांना कितपत पसंत पडते हे मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 19:16


comments powered by Disqus