सिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार, shard pawar concern about siddharth hostel

सिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार

सिद्धार्थ हॉस्टेलची डागडुजी राष्ट्रवादी करणार


www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

वडाळ्यातल्या सिद्धार्थ विहार हॉस्टेलची दुरवस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतलीये.
राष्ट्रवादी काँग्रेस या हॉस्टेलच्या इमारतीची डागडुजी करेल आणि तिथल्या सर्व गैरसोयी दूर करणार आहे. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील उद्या हॉस्टेलला भेट देणार आहेत.

सिद्धार्थ विहार हॉस्टेल एकेकाळी दलित चळवळीचं केंद्र होत. आज मात्र हे हॉस्टेल शेवटच्या घटका मोजतंय. इमारत मोडकळीस आलीये, तिथलं वातावरण अस्वच्छ आहे.

अनेक दलित नेत्यांनी आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकत्यांनी या वसतिगृहातील रूम बळकावल्यात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उदात्त हेतूनं तळागाळातील लोकांसाठी ही संस्था सुरू केली त्याकडे लक्ष द्यायला आता गटातटात विखुरलेल्या नेत्यांकडे मात्र वेळ नाही... झी मीडियानं या हॉस्टेलच्या दुर्दशेला वाचा फोडलीये...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 19, 2013, 20:41


comments powered by Disqus