मुंबईत शेअर ब्रोकरची हत्या, Share broker murder in Mumbai

मुंबईत शेअर ब्रोकरची हत्या

मुंबईत शेअर ब्रोकरची हत्या
www.24taas.com, मुंबई

मुंबईत बोरीवलीच्या आदेश्वर अपार्टमेन्टमध्ये राहणा-या एका शेअर ब्रोकरची हत्या करण्यात आली. विजय वोरा असं हत्या झालेल्या शेअर ब्रोकरचं नाव आहे. चौथ्या मजल्यावर फ्लॅट क्रमांक 408 मध्ये राहणा-या वोरांनी मघरातच एक मंदिरही बनवलं होतं. ज्यावेळी ही हत्या करण्यात आली, त्यावेळी वोरांची पत्नी काही कामासाठी बाहेर गेली होती.

रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास घरी आल्या, त्यावेळी वोरा बेशुद्ध अवस्थेत घरात पडल्याचं त्यांनी पाहिलं. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, तिथे त्याना मृत घोषित करण्यात आलं.

घटनास्थळी पोलिसांना एक 9 इंच उंचीची देवाची मूर्ती गायब झाल्याचं आढळलं. तर आश्चर्य म्हणजे घरातील किमती सामान आणि दागदागिने मात्र जशास तसे होते. मारेकरी टॅक्सीने आले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

First Published: Wednesday, April 3, 2013, 12:45


comments powered by Disqus