शर्मिला राज ठाकरे टोल न देताच पुण्याकडे रवाना

शर्मिला राज ठाकरे टोल न देताच पुण्याकडे रवाना

शर्मिला राज ठाकरे टोल न देताच पुण्याकडे रवाना

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

शर्मिला राज ठाकरे यांनीही आपण आपले पती राज ठाकरे यांच्या विचारांशी सहमत असल्याचं दाखवून दिलं आहे.

शर्मिला ठाकरे यांनीही टोल नाक्यावर टोल दिलेला नाही, तसेच टोल अन्यायकारक असल्याने देऊ नका असं आवाहनही शर्मिला राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

खालापूर टोलनाक्यावर शर्मिला ठाकरे टोल न देताच पुण्याकडे निघाल्या आहेत. राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा आहे, या सभेसाठी शर्मिला ठाकरे पुण्याला रवाना झाल्या आहेत.

राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे, टोलनाके आणि विरोधकांविषयी राज ठाकरे आज काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 9, 2014, 15:24


comments powered by Disqus