माहीमच्या तरूणीला `लिव्ह अँड रिलेशनशीप`चा फटका, she looted by friend in leave and relationship

माहीमच्या तरूणीला `लिव्ह अँड रिलेशनशीप`चा फटका

माहीमच्या तरूणीला `लिव्ह अँड रिलेशनशीप`चा फटका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्याशी आपला मित्र असं वागूच शकत नाही, असा ठाम विश्वास असणाऱ्या एका तरूणाने तरूणीच्या घरातील 84 लाखांची चोरी केलीय. अखेर पोलिसांनी या तरूणानेच चोरी कशी केली हे शोधून काढलंय.

मुंबईत मित्रांसह सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणीच्या घरी झालेल्या तब्बल ८४ लाखांच्या घरफोडी प्रकरणात मालमत्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी तिच्यासोबत राहणार्‍या तिच्या मित्रासह त्याच्या एका साथीदाराला अटक केली आहे.

माहीमच्या मोगल लेन परिसरातील इमारतीत ही तरुणी तिसर्‍या मजल्यावर राहते. शुक्रवारी नवीन सिनेमा प्रदर्शित झाल्याने मित्र-मैत्रिणींसोबत ती याच परिसरातील स्टार सिटी सिनेमागृहात गेली होती. पहिलाच शो असल्याने दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती निघाली होती.

सिनेमाचा शो संपल्यानंतर साडेतीन वाजता ती घरी परतली. घराचा दरवाजा उघडून तिने आत प्रवेश केला असता घरातील बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तसेच कपाटाच्या चाव्याही गायब झाल्या होत्या.

तिने दुसर्‍या चावीच्या मदतीने कपाटातील लॉकर उघडून पाहिला असता त्यातील सोन्याचे आणि हिर्‍याचे दागिने असा एकूण ८४ लाखांचा ऐवज गायब होता. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच तिने तत्काळ माहीम पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली असता चोरट्याने कुठलीही तोडफोड न करता सहजरीत्या ऐवज चोरला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे ही चोरी ओळखीच्याच व्यक्तीने घरातील चाव्या घेऊन केली असल्याचा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, तिच्या घरात तिच्यासोबत अविनाश काळे हा तरुण लीव्ह अँड रिलेशनमध्ये राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याची चौकशी केली. मात्र तो ही चोरी करूच शकत नाही, असा विश्‍वास तरुणीने व्यक्त केला.

याच दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता विभागाचे अधिकारीही करीत होते. त्यांना या तरुणाचा संशय आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे मोबाइल लोकेशन तपासले असता घटनेच्यावेळी तो घरातच असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता विष्णू कांबळे या साथीदाराच्या मदतीने आपण ही चोरी केल्याचे त्याने कबूल केले. त्यानुसार मालमत्ता विभाग आणि पोलिसांच्या पथकाने आज दहिसर येथे सापळा रचून कांबळेला अटक केली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 18:40


comments powered by Disqus