मुंबई समुद्रात जहाजाला आग, २२ जण अडकलेत, Ship in ocean in Mumbai fire

मुंबई समुद्रात जहाजाला आग, २२ जण अडकलेत

मुंबई समुद्रात जहाजाला आग, २२ जण अडकलेत
www.24taas.com,मुंबई

एम. व्ही. एमस्टरडॅम या मालवाहू जहाजाला मुंबईजवळ भर समुद्रात आग लागलीय. कोलंबोकडे जाणारे जहाज मुंबईपासून साधारण पाच किलोमीटरवर असताना ही आग लागली. या जहाजावर २२ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

एम व्ही एमस्टरडॅम या मालवाहू जहाजाला मुंबईजवळ भर समुद्रात आग लागलीय. कोलंबोकडे जाणारे जहाज मुंबईपासून साधारण पाच किलोमीटरवर असताना ही आग लागली. आग लागल्याचं समजताच तटरक्षक दलाची दोन जहाजं घटनास्थळी रवाना झाले.

सध्या ही आग विझवण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आलय मात्र आगीची धग अजूनही कायम आहे. सर्वप्रथम जहाजाच्या इंजिनमध्ये आग लागल्याचा प्राथमिक अंदाज तटरक्षक दलानं व्यक्त केलाय. या जहाजामध्ये २० ते २२जण अडकून आहेत. त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न तटरक्षक दलाकडून सुरु आहेत.

First Published: Monday, September 10, 2012, 09:57


comments powered by Disqus