शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेत, राऊतांची सडकून टीका, Shiv Sena activists In MNS , Sanjay Raut comment

शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेत, राऊतांची सडकून टीका

शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेत, राऊतांची सडकून टीका
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या अणुशक्तीनगरमधले शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजाराम मंगेला यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कृष्णकुंजवर त्यांनी मनसेत प्रवेश केला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केलेय.

शिवसेनेच्या राहुल शेवाळेंच्या दमदाटीला कंटाळून आपण मनसेत प्रवेश केल्याचं त्यांनी म्हटलंय. शेवाळेंच्या पत्नीही विभागातील नागरिकांना दमदाटी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

दरम्यान, शिवसेना सोडून गेलेल्या बंडखोरांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केलीय. शिवबंधनाचा धागा मजबूत असून ज्याचं मनगट मजबूत त्यावरच हा धागा राहणार असल्याचा आत्मविश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय.

शिवसेना महासागर असून एक दोन थेंब इकडे तिकडे गेले तरी फरक पडणार नसल्याचं टोला त्यांनी बंडखोरांना लगावलाय. गेल्या काही दिवसात ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.

First Published: Tuesday, March 18, 2014, 16:33


comments powered by Disqus