शिवसेना-भाजप जागावाटप निश्चित, Shiv Sena- BJP Sits in election

शिवसेना-भाजप जागावाटप निश्चित

शिवसेना-भाजप जागावाटप निश्चित
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभा निवडणुकीचे पडघम चांगलेच वाजू लागले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीपाठोपाठ आता महायुतीतही जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

याचसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी चर्चा केली. गेल्या निवडणुकीतलाच २६-२२ चा फॉर्म्युलाच कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. तसंच दस-यानंतर जोमाने निवडणुकीच्या कामाला लागण्याचा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

तसंच आरपीआयच्या रामदास आठवलेंशीही दस-यानंतरच चर्चा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 25, 2013, 22:43


comments powered by Disqus