शिवसेनेचे विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर, Shiv Sena candidate for the Legislative Council declared

शिवसेनेचे विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर

शिवसेनेचे विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार्‍या नऊ जागांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने विद्यमान सदस्य डॉ. नीलम गोर्‍हे आणि युवा सेनेचे प्रवक्ते अॅड. राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या २० मार्चला निवडणूक होणार आहे. विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, जयप्रकाश छाजेड, राष्ट्रवादीचे हेमंत टकले, किरण पावसकर, राणा जगजितसिंग, संजय पाटील, भाजपचे विनोद तावडे, पांडुरंग फुंडकर आणि शिवसेनेच्या डॉ. गोर्‍हे हे सदस्य २० एप्रिलला निवृत्त होत आहेत.

या निवडणुकीत विजयासाठी २९ आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे ३, राष्ट्रवादीचे २ तर शिवसेना-भाजपचे ३ उमेदवार सहज विजयी होतील. नवव्या जागेसाठी मात्र चुरस आहे.

शिवसेनेने डॉ. गोर्‍हे यांना तिसर्‍यांदा संधी दिली आहे. तर नार्वेकर हे युवा सेनेचे प्रवक्ते असून त्यांच्यावर शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी आहे. निष्णात वकील म्हणून नार्वेकर यांची ख्याती आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 28, 2014, 09:15


comments powered by Disqus