Last Updated: Friday, November 22, 2013, 13:47
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीय. रावले-राज यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याचं समजतंय.
राज यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आलाय.
दरम्यान, ही भेट आपण वैयक्तिक बाबीसाठी घेतली, असं मोहन रावले यांनी झी मीडियाला सांगितलं. पण शिवसेना आणि मनसेचं नातं बघता या भेटीनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 13:47