Last Updated: Monday, December 2, 2013, 15:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेना हा दलालांचा पक्ष आहे, मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे वाट लावत आहेत अशी टीका करणारी पत्रकार परिषद सुरू असतानाच, मोहन रावले यांना शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. या संदर्भातील माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली.
शिवसेनेबद्दल याआधी अनेकदा व्यक्त केलेली नाराजी, काही दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट आणि आज पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेवर केलेली सडाडून टीका या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अत्यंत तातडीने कारवाई केली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 2, 2013, 15:09