शिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, Shiv sena vs Nitesh Rane

शिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा

शिवसेना- नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेना कार्यकर्ते आणि नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वरळीत तुंबळ हाणामारी झाली. कामगार संघटनांवरून हा राडा झाला. यावेळी पोलिसांचा लाठीचार्ज केला.

नितेश राणेंचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मुंबईत तुंबळ हाणामारी झाली. वरळीतल्या फोर सिझन हॉटेलच्या काही कर्मचा-यांचा नितेश राणेंच्या महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेत प्रवेश होणार होता. त्यासाठी राणेंसह संघटनेचे अनेक कार्यकर्ते हॉटेलच्या परिसरात जमणार होते.

मात्र भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी राणेंची गाडी अडवली. त्यामुळे वातावरण चिघळलं आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड हाणामारी झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या हाणामारीत अनेक जण जखमी झालेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 18:49


comments powered by Disqus