मुंबईत शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या , Shiv Sena woman murdered in Mumbai

मुंबईत शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या

मुंबईत शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या
www.24taas.com, मुंबई

मुंबईत एका शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अॅंटॉप हिल परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. परिसात तणावाचे वातावरण आहे.

हत्या करण्यात आलेल्या महिला कार्यकर्तीचे नाव सोनी असल्याचे समजते. शिवसेनेच्या स्थानिक शाखाप्रमुख यांनी या हत्येला दुजोरा दिलाय. हत्या झालेली महिला ही शिवसेनेची सदस्य असल्याचे या शाखाप्रमुखाने स्पष्ट केलेय. मात्र, या महिला सदस्याची का हत्या झाली याबाबत काही माहिती नसल्याचे समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या महिलेची परिसरात चांगली ओळख होती. तिचे पक्षामध्ये वजन होते. पक्षामध्ये चांगली प्रतिमा असल्याने सोनी या महिलेची अधिक ओळख झाली होती. तिच्या लोकप्रियेमुळे काहींची गोची झाली होती, अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

First Published: Tuesday, April 16, 2013, 12:55


comments powered by Disqus