Last Updated: Wednesday, October 9, 2013, 08:08
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्य सरकार आणि मुंबई महापालिकेनेही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला न्यायालयात कोणतीही हरकत घेतली नाही. जर मेळावा घेण्यास परवानगी नाकारली तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राज्य सरकारने न्यायालयात सांगितले.
गेली ४७ वर्षे शिवसेनेच्या दसरा होत आहे. या मेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे सेनेने कोर्टात धाव घेतली. या मेळाव्यात शेरेबाजीवर निर्बंध टाकत न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दसऱ्याचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.
उच्च न्यायालयाच्या परवानगीमुळे यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून वाघाची डरकाळी घुमणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क यांचे गेल्या साडेचार दशकांचे अतूट नाते आहे.
कार्यक्रमाच्या दिवशी मेळाव्याच्या दोन तास आधी, मेळाव्यादरम्यान आणि मेळावा संपल्यावर आवाजाची पातळी नोंदविली जाणार आहे. तसेच, हा अहवाल २८ ऑक्टोबर रोजी न्यायालयात दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
शांतता क्षेत्र घोषीत केलेल्या दादरमधील शिवाजी पार्क शिवसेनेचा दसरा मेळावा हा राजकीय मेळावा आहे. त्यामुळे त्याला मुंबई पालिका प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. या विरोधात सेनेने न्यायालयात धाव घेतली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 9, 2013, 07:55