Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:22
www.24taas.com, मुंबईव्हॅलेनटाईन डेला आयुष्यभर विरोध करणाऱ्यां शिवसेनेनं आज मुंबईत व्हॅलेनटाइन डे साजरा केला. हा व्हॅलेनटाइन डे जेष्ठ नागरिकांबरोबर साजरा करताना गुलाबाचं फूल आणि तुळशीचं रोपट शिवसैनिकांनी सिनियर सिटीजन्सना दिले.
शिवसेनेच्या ह्या बदललेल्या भुमिकेबाबत साऱ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. नेहमीच आक्रमकपणे आपल्या भुमिका मांडणारी शिवसेना सध्या मात्र वेगळी भुमिका घेत असल्याने त्यांच्यातील हा बदल नक्कीच साऱ्यांना आवाक् करून जाणारा आहे.
तरुण तरुणींसाठी अतिशय रोमांचकारी असलेला हा दिवस आहे. आजच्या दिवशी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देण्याचा हक्काचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय. आज कित्येक जोडपी लग्नाच्या रेशीमगाठीत बांधली जाणार आहेत. तर कित्येक तरुण तरुणी आपल्या साथीदाराला आपल्या मनातल्या भावना सांगणार आहेत.
First Published: Thursday, February 14, 2013, 18:13