शिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन, Shivsena MLA omraje suspend for 1 year

शिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन

शिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन
www.24taas.com, मुंबई

शिवसेनेचे उस्मानाबादचे आमदार ओमराजे निंबाळकर यांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलयं. विधानसभा उपाध्य़क्षांचा राजदंड पळवल्याप्रकरणी निंबाळकरांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

दुष्काळाचा मुद्दा आणि उस्मानाबादच्या पाणीप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी संतापलेल्या ओमराजेंनी राजदंड पळवला होता... त्यामुळं विधानसभा उपाध्यक्ष वसंत पूरके यांनी उस्मानाबादचे आमदार ओमराजे निंबाळकर यांना निलंबित केलं आहे.

या कारवाईविरोधात विरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर ठिय्या आंदोलन केलंय.. दरम्यान विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासाठी तहकूब करण्यात आलं...

First Published: Tuesday, April 16, 2013, 13:12


comments powered by Disqus