Last Updated: Friday, December 21, 2012, 14:30
www.24taas.com, मुंबईपाकिस्तानच्या क्रिकेट टीमला विरोध करणार, प्रत्येक सामन्यावेळी विरोध करू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. उद्यापासून पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आक्रमक झाली आहे.
पाकच्या भारत दौऱ्याला आपला कायम विरोध राहिल असं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळण्याबाबत सेनेने नेहमीच विरोध केला आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तान दौऱ्याला विरोध केला होता.
त्याआधीही शिवसैनिकांनी दिल्ली आणि मुंबई मधील मैदानावरील खेळपट्टी उखडून टाकली होती. त्यामुळे पाकिस्तान दौऱ्याला आताही विरोध करणार असल्याची भुमिका शिवसेनेने घेतली आहे. तर काही दिवसापूर्वीच सेनेसोबत मनसेनेही पाकिस्तान दौऱ्याला विरोध केला होता. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनीही दिला होता.
First Published: Friday, December 21, 2012, 14:13