Last Updated: Monday, January 13, 2014, 13:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेत सध्या महिला नगरसेविकांची मुस्कटदाबी होतेय. शिवसेनेच्या रणरागिणींना सध्या पक्षातील स्वकियांविरूद्धच दोन हात करावे लागतायेत. स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दहा दिवसांपासून नगरसेविका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न करतायत. मात्र अजूनही त्यांना भेट मिळालेली नाही. त्यामुळं नाराज असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपल्या फेसबुक स्टेटसवर धृतराष्ट्रांच्या नगरीत द्रोपदीच्या हाकेला धावून येणारा कृष्ण कुणी होईल का? असा थेट सवाल केलाय.
शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर हे शिवसेनेच्याच नगरसेविकांच्या कामांमध्ये अडथळा आणत असल्याचा आरोप होतोय. याचप्रकरणी कैफियत मांडण्यासाठी शुभा राऊळ आणि इतर नगरसेविका उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गेल्या १० दिवसांपासून त्यांना उद्धव यांच्या जवळचे लोक भेटू देत नसल्याचं कळतंय.
शुभा राऊळ यांचं फेसबुक स्टेटर२१व्या शतकातही सावित्रीच्या लेकींचा लढा सुरूच आहे. ह्या आंतरराष्ट्रीय नगरीत,
ह्या लेकी स्थानिक स्वराज्य संस्थेनं दिलेल्या ५०% आरक्षणानुसार निवडून आल्या,
स्वतःला सिद्ध करताना येणारे अडथळे ओलांडत, स्वाभिमान सांभाळत, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात ह्या द्रौपदीचं मानहानीरूपी वस्त्रहरण सुरू आहे. ह्या धृतराष्ट्रांच्या नगरीत द्रौपदीच्या हाकेला धावून येणारा कृष्ण कोणी होईल का?
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मात्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 13, 2014, 13:31