Last Updated: Tuesday, August 6, 2013, 11:35
www.24tass.com , झी मीडिया, मुंबई मुंबईतल्या कामाठीपुऱ्यात राहणारी श्वेता कट्टी अखेर गुरूवारी न्यूयॉर्कला रवाना झालीय. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेची १८ वर्षीय ही मुलगी शिक्षणासाठी थेट सातासमुद्रापार गेलीय. अमेरिकेतल्या शिक्षणासाठी तिला स्कॉलरशिप मिळालीय.
महापालिकेच्या शाळेत शिकणारी श्वेता आता न्यूयॉर्कच्या बार्ड विश्वविद्यालयात ‘मानसशास्त्र’ या विषयातली पदवी घेण्यासाठी परदेशात गेलीय.
श्वेता काय शिकायला गेलीय हे माहित नाही. पण, मला माझ्या मुलीचा अभिमान असल्याचं श्वेताची आई वंदना म्हणते. ती लहानपणापासूनच हुशार होती. आठव्या वर्गापासून दक्षिण मुंबईतल्या शाळेत ती शिकायला जात होती, अशी आठवण तिच्या आईनं सांगितली. तसंच श्वेता चार वर्षांनंतर परतणार असल्याचंही तिनं सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, August 5, 2013, 12:47