Last Updated: Wednesday, March 26, 2014, 08:44
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईमुंबईतला प्रसिध्द सिध्दिविनायक गणपती आता ग्रंथरूपानंही भक्तांच्या भेटीला येतोय. `श्री सिध्दिविनायक अनन्य साधारण ऊर्जा` या ग्रंथाचं मंगळवारी मुंबईत प्रकाशन झालं. या वेळी ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं.
श्रींच्या चरणी या ग्रंथाची पूजा करून दिंडीची सुरवात करण्यात आली. मुख्य म्हणजे श्रींच्या संपूर्ण माहितीसह श्रींच्या दुर्मिळ अलंकारांचं दर्शनही फोटोरूपानं या निमित्तानं होणार आहे. गोपाळ बोधे यांनी या ग्रंथाची संकल्पना आणि छायाचित्रण केलंय. हे पुस्तक सिद्घीशक्ती पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. श्री सिद्घिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सुभाष मयेकर, अॅड. बीना शहा, नितीन कदम, मंगेश शिंदे, सतीश पाडावे, धनंजय बरदाडे, एकनाथ संगम आदींच्या उपस्थित पस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विश्वस्त मंगेश शिंदे यांनी मंदिराच्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. पुस्तक तयार होण्यासाठी हातभार लागलेल्या सर्वांचा बोधे यांनी मानचिन्ह देऊन सन्मान केला.
भारतात मंदिर संस्कृतीला महत्त्व आहे. आतापर्यंत मी देशातील 18 आणि राज्यांतील 272 श्रद्घास्थानांची छायाचित्रे टिपली आहेत. पण आज हे सिद्घिविनायकाचे पुस्तक घडतेय आणि ते माझ्या हातून घडतेय, यातच माझ्या जन्माचे सार्थक झाल्यासारखे मला वाटते आहे, अशा शब्दांत गोपाळ बोधे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 26, 2014, 08:44