एक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!, sms for booking railway ticket

एक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!

एक एसएमएस करणार रेल्वे तिकीट बुक!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आता केवळ एका एसएमएसच्या साहाय्यानं तुम्हाला रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. ई-तिकिटानंतर आता `इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन`नं एसएमएसची सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

मेल/एक्सप्रेसची तिकिटे मोबाइलवरून एसएमएस आणि यूएसएसडीवरून (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी डाटा) मिळण्याची ही यंत्रणा १ जुलैपासून लागू होणार आहे. मोबाइल बँकिंगच्या सहाय्याने प्रवाशांना तिकीट मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. सर्वच मोबाईल पुरवठादारांकडून ही सुविधा उपलब्ध असले. यासुविधेनुसार, दोन एसएमएससाठी तीन रु. आणि बँकेकडून पाच हजारांपर्यंतच्या रकमेसाठी पाच रुपयांचे शुल्क आकारले जाईल. या सुविधेसाठी एजंट वा अन्य कोणतेही दर आकारले जाणार नसल्याचं ` आयआरसीटीसी ` नं स्पष्ट केलंय.

कसा करणार ‘एसएमएस’वरून तिकीट बुक
एसएमएसवरून तिकीट बुक करण्यासाठी आधी आयआरसीटीसी आणि बँकेत आपला मोबाइल नंबर नोंदवणं आवश्यक आहे. त्यानंतर बँकेकडून ` मोबाइल मनी आयडेंटिफायर `आणि ` ओटीपी ` ( वन टाइम पासवर्ड) मिळाल्यानंतर एका एसएमएसद्वारे मेल/एक्स्प्रेस क्रमांक , प्रवासाचे ठिकाण , प्रवासाची वेळ , दर्जा , प्रवाशांचे नाव नोंदवावा लागेल. त्यानंतर `आयआरसीटीसी`कडून ट्रान्झॅक्शन आयडी मिळेल. बँकेकडून रक्कम वळती केल्यावर तुम्हाला तिकीट मिळेल.

यूएसएसडी पद्धतीत विशिष्ट क्रमांकावरून तिकीट बुकिंगचा पर्याय असेल. त्यात स्टेशन , ट्रेन क्रमांक , प्रवासाची वेळ , वर्ग आदींची माहिती भरावी लागेल. मोबाइल बँकिंगवरून रक्कम अदा करण्यासाठी एमपिनची नोंद करून तिकीट काढता येईल. प्रवासादरम्यान तिकीट नोंदणीचा एमएमएस योग्य ओळखपत्रासह ग्राह्य मानला जाईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 12, 2013, 09:58


comments powered by Disqus