Last Updated: Thursday, September 26, 2013, 18:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी एक सॉफ्टवेअर तयार केलंय. पण त्याचा फायदाच होत नाहीय. ब-याचशा महिलांना हे सॉफ्टवेअर माहीतच नाही. संकटसमयी हे सॉफ्टवेअर महिलांच्या उपयोगी पडणार आहे.
मुंबई पोलिसांनी ‘इन केस ऑफ इमर्जन्सी’ हे विशेष सॉफ्टवेअर महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलंय. महिलांनी हे सॉफ्टवेअर त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यायचं. संकटसमयी फक्त एक बटण दाबलं की जवळच्या लोकांना मेसेज जाण्याची सोय या सॉफ्टवेअरमध्ये आहे. पण अनेक महिलांना हे सॉफ्टवेअर माहितच नाही आणि आतापर्यंत किती महिलांनी त्याचा वापर केला, त्याची माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही.
‘इन केस ऑफ इमर्जन्सी’ या सुरक्षा हेल्पलाईनचा वापर महिलांनी करावा, यासाठी अमिताभ बच्चनसह अनेक सिनेस्टारनी प्रचार केला. पण काहीही उपयोग झाला नाही. त्याचबरोबर हे सॉफ्टवेअर अनेक मोबाईल्समध्ये डाऊनलोड होत नाही, अशाही तक्रारी आहेत.
मुंबईत महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिलांवरचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करतायत. पण महिलांनी स्वसंरक्षणासाठी प्रयत्न करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, September 26, 2013, 18:38