सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - भुजबळ, Somayya on abrunukasan to claim - Bhujbal

सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - भुजबळ

सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार - भुजबळ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आयटी रिटर्न्ससंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांनी म्हंटलंय. त्याचबरोबर सोमय्या कुणाची तरी सुपारी वाजवण्याचं काम करतायत, असं म्हणत भुजबळांनी सोमय्यांवर टीका केलीय.

किरीट सोमय्या यांनी छगन भुजबळ, तसंच समीर आणि पंकज भुजबळ यांच्यावर नवे गंभीर आरोप केलेत. या तिघांनी आपल्या ११ कंपन्यांचे आयकर परतावे गेल्या ५ वर्षांत भरलेच नसल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. या पाच वर्षांत त्यांची संपत्ती १२ हजार टक्क्यांनी वाढल्याचा दावा त्यांनी केलाय. याविरोधात सोमय्यांनी आर्थिक गुन्हे विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३३० पानी तक्रार दाखल केली.

भुजबळांवर कारवाईबाबत एसीबीनं गेल्या दोन वर्षांत तीन वेळा सरकारकडे विचारणा केली. मात्र प्रत्येक वेळी सरकारनं नकार दिल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. आपली सोमय्या यांनी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा दावा ठोकण्यात येणार आहे, असे भुजबळ म्हणालेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014, 23:08


comments powered by Disqus