मंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं..., son arrested in dahisar murder case

मंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं...

मंदिरात भिंतीत पुरलेल्या मृतदेहाचं गूढ अखेर उलगडलं...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दहिसरच्या आनंदनगर परिसरातील विट्ठल मंदिरात झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत उलगडा केलाय. याप्रकरणी पोलिसांनी मृत गट्टू लिंगान्ना अट्टापल्ली याच्या मुलाला अटक केलीय. वडील दारू पिऊन आईला वारंवार मारहाण करीत असल्याच्या रागातून सुरेशने वडिलांचा खून केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. शुक्रवारी मंदिरात गट्टू लिंगान्नाचा मृतदेह आढळून आला होता.

शनिवारी, मुंबई पश्चिम उपनगरातील दहिसर इथल्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या भिंतीत एक मृतदेह लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळला होता. हा मृतदेह याच मंदिराच्या परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या गट्टू लिंगान्ना अट्टापल्ली याचा असल्याचं समोर आलं. मंदिर परीसरात दोन दिवसांपासून नाल्यातील सांडपाणी जात नव्हते. त्यामुळे एक कर्मचारी दुरुस्तीसाठी वर गेला. नाल्याच्या भिंतीची एक लादी त्याने काढली असता त्याला मृतदेहाचा हात दिसला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भिंतीचे पाइप काढून मृतदेह बाहेर काढला गेला होता.

या हत्येचं गूढ उकलून काढण्यात पोलिसांना यश आलंय. गट्टू लिंगान्ना अट्टापल्ली याचा खून त्याच्या मुलानेच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, January 5, 2014, 10:35


comments powered by Disqus