स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणाऱ्या अन्सारीला जन्मठेप, Spanish girl rape, Ansari`s life-imprisonment

स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणाऱ्या अन्सारीला जन्मठेप

स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणाऱ्या अन्सारीला जन्मठेप
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या बांद्राभागात २७ वर्षीय स्पॅनिश मुलीवर बलात्कार करणा-या बादशाह मोहम्मद अन्सारीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. मुंबई सेशन्स कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. गेल्या वर्षी ७ नोव्हेबरला बादशाह मोहंम्मद अंन्सारीनं स्पॅनिश मुलीवर बलात्कार केला होता. त्याचबरोबर चोरीच्या प्रकरणातही कोर्टानं अंन्सारीला शिक्षा सुनावली आहे.

स्पॅनीश मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावर आज मुंबई सेशन्स कोर्ट निकाल दिला गेला आहे. गेल्यावर्षी या महिलेवर मोहम्मद अन्सारी या व्यक्तीनं बलात्कार केला होता. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेत. मोहम्मद अंसारी या एक अट्टल चोर असून खिडकीच्या मार्गे ते घरात शिरला होता. चोरी केल्यानंतर मोह्हमद ने स्पॅनीश मुलीवर बलात्कार केला आणि पळून गेला.

मात्र पोलीसांनी नंतर त्याला अटक केली. या स्पॅनीश मुलीवर रेप करण्याआधी मोहम्मद अंसारीने अभिनेता डिनो मोर्या यांच्या घरी चोरी केली होती. त्या प्रकरणात तो जामिनावर सुटुन आला होता. त्याचं दरम्यान त्याने हे घृणास्पद कृत्य केलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, December 27, 2013, 15:07


comments powered by Disqus