महिला स्वसंरक्षणासाठी हलक्या वजनाची रिव्हॉल्व्हर ‘निर्भिक‘!Special Revolver for ladies launch soon

महिला स्वसंरक्षणासाठी हलक्या वजनाची रिव्हॉल्व्हर ‘निर्भिक‘!

महिला स्वसंरक्षणासाठी हलक्या वजनाची रिव्हॉल्व्हर ‘निर्भिक‘!
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

भारतात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार आणि बलात्काराच्या घटना सामोऱ्या येत असतानाच आता भारतीय दारूगोळा कारखान्यानं ०.३२ बोअरची हलकी निर्भिक ही वजनानं हलकी रिव्हॉल्व्हर तयार केली आहे. तिचा वापर महिला स्वसंरक्षणार्थ करू शकतील.

या रिव्हॉल्व्हरचं वजन अवघं ५०० ग्रॅम असून तिचं नाव निर्भयावरून देण्यात आलंय. या रिव्हॉल्व्हरची किंमत मात्र खूप जास्त म्हणजे १ लाख २२ हजार ३६० रुपये आहे आणि ती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात उपलब्ध केली जाईल, असं दारूगोळा कारखान्याचे महाव्यवस्थापक अब्दुल हमीद यांनी सांगितलंय. ते म्हणाले, की सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर संशोधकांनी वजनाने हलकी रिव्हॉल्व्हर तयार करण्याचं संशोधन सुरू केलं होतं.

स्त्रिया ही रिव्हॉल्व्हर पर्समध्ये ठेवू शकतात. पॉईंट ३२ बोअरची ही रिव्हॉल्व्हर ७५० ग्रॅम वजनाची असते, पण आम्ही ती ५०० ग्रॅम वजनात तयार केली आहे. तिचं नाव निर्भिक असं आहे. २०१२ मध्ये १६ डिसेंबरला दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. तेव्हापासून रिव्हॉल्व्हर तयार करण्यासाठी संशोधन चालू होतं.

या रिव्हॉल्व्हरचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्यां महिलेकडून करण्याचा विचार आहे. हमीद यांनी सांगितलं, की या रिव्हॉल्व्हरसाठी दहा जणांनी मागणी नोंदवली आहे आणि रोज त्याबाबत महिला चौकशी करीत आहेत. दागिन्यांच्या पेटीत रिव्हॉल्व्हर मिळणार स्त्रियांना दागिन्यांची मोठी आवड असते, पण आता त्यांना त्यांच्या संरक्षणासाठी असलेली निर्भिक रिव्हॉल्व्हर दागिन्यांच्या खास पेटीतून जो पहिलं नाव नोंदवेल त्याला प्रथम या तत्त्वानुसार दिली जाईल.
ही रिव्हॉल्व्हर टिटॅनियमच्या संमिश्राची बनवली असून ती पुरुषांनाही विकली जाईल, पण मुख्य उद्देश ती महिलांना देणं हा आहे, असं हमीद यांनी सांगितलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 15:50


comments powered by Disqus