चला विकेंड घालवण्यासाठी मुंबईत जाण्याचं ठिकाण पाहाSpecial trip organised by Sanjay Gandhi National P

विकेंड घालवण्यासाठी मुंबईतलं खास ठिकाण

विकेंड घालवण्यासाठी मुंबईतलं खास ठिकाण
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तुम्हाला दाट काळोखात जंगली प्राणी बघायचे आहेत? किंवा आकाश दर्शन करायचे आहे? हे सर्व आता मुंबईत शक्य आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राधिकरणानं या उन्हाळ्याच्या सुट्टीत वेगवेगळे उपक्रम सुरु केलेत. या उपक्रमाला पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या की मुंबईकर हमखास बाहेरगावी जातात. मात्र आता गावातलं वातावरण मुंबईत अनुभवण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राधिकरणानं पुढाकार घेतलाय. रात्रीच्या काळाखोत प्राण्यांचं दर्शन, वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचे आवाज, तंबूतला निवास या सारखी खास सुट्टी स्पेशल मेजवाणी सादर केलीय.

हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा यासाठी सोशल नेटवर्कींग साईटची मदत घेतली जातेय. पर्यटकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.

मुंबईकरांच्या आयुष्यातलं विकेंडचं महत्त्व लक्षात घेऊन खास शनिवार-रविवार ही सहल आयोजित करण्यात येतीय. त्यामुळं या सुट्टीतला एक धमाल विकेंड साजरा करण्यासाठी नॅशनल पार्कला भेट द्यायलाच हवी


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 4, 2014, 18:42


comments powered by Disqus