बॉलिवूड, स्ट्रगलिंग अभिनेत्री, स्पॉटबॉय आणि बलात्कार!, spot boy held for raping actress

बॉलिवूड, स्ट्रगलिंग अभिनेत्री, स्पॉटबॉय आणि बलात्कार!

बॉलिवूड, स्ट्रगलिंग अभिनेत्री, स्पॉटबॉय आणि बलात्कार!
www.24taas.com, मुंबई

आपण सिनेमा फायनान्सर असल्याचं भासवत स्पॉटबॉयनंच एका ‘स्ट्रगलिंग’ अभिनेत्रीवर बलात्कार केलाय. मोठ्या बॅनरखाली काम मिळवून देण्याच्या थापा मारत या २३ वर्षीय स्पॉटबॉयनं आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार या अभिनेत्रीनं पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलीय.

मुंबईमध्येच स्थायिक असलेल्या २२ वर्षीय पीडित मुलगी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून धडपडत होती. याच दरम्यान, पश्चिम उपनगरातल्या गोरेगावच्या मोतीलाल नगर स्टुडिओच्या बाहेर तिची ओळख मुस्तफा अली खान याच्याबरोबर झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ‘स्ट्रगलिंग’ अभिनेत्रीसमोर मुस्तफानं शारीरिक संबंधांची मागणी ठेवली. त्याबदल्यात काम मिळवून देण्याचं आमिष त्यानं या मुलीला दाखवलं.

मुस्तफाच्या सांगण्याप्रमाणे केल्यानंतरही या मुलीला सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही तेव्हा तिनं पोलिसांमध्ये मुस्तफा खानविरुद्ध तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी मुस्तफाला अटक केलीय.

First Published: Friday, March 1, 2013, 13:03


comments powered by Disqus