Last Updated: Tuesday, February 25, 2014, 08:27
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार तर विधानपरिषधेत अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात होत असल्याने यावेळचं राज्य विधिमंडळाचं अधिवेशनही चार दिवसांचंच होत आहे. त्यात मांडला जाणारा अर्थसंकल्पही निवडणुकीमुळे चार महिन्यांसाठीचाच म्हणजेच अंतरिम असेल.
या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सरकारने मागील अर्थसंकल्पात दिलेल्या करसवलती पुढे लागू राहतील अशीही शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 08:26