राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर

राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर

राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी 13 फेब्रुवारीपासून संपावर जाणारेत. 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचा-यांनी केलीय.

सरकारी कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा, म्हणजे शनिवार आणि रविवार सुटीची मागणी केली आहे.

संघटनेच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री प्रतिकूल आहेत. या विषयावर मुख्यमंत्र्यासोबतची त्यांची बैठकही निष्फळ झालीय. त्यामुळे या कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय.

या संपामुळे राज्य भरातल्या सरकारी कार्यालयातलं कामकाज ठप्प होणार असून सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 4, 2014, 19:40


comments powered by Disqus