Last Updated: Saturday, February 15, 2014, 10:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईव्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयाच्या काऊंसेलिंगनं कमाल केलीय. कारण दुरावलेली मनं एकत्र आणण्याची कमाल या काऊंसेलिंगनं केलीय.. पाहूया ही अनोखी प्रेमाची गोष्ट.
आशुतोष आणि प्रियंका.. तब्बल दोन वर्षांनी ही दोन दुरावलेली मनं पुन्हा एकत्र आली.. २०००साली दोघंही रेशीमगाठीत अडकले.. त्यानंतर दोन मुलांसह त्यांचा संसार सुरु होता.. मात्र अचानक २०११ साली कौटुंबिक कलहामुळे दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला.. वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची सुनावणी सुरु झाली.. याच काळात न्यायालयाच्या काऊंसेलिंगनंतर दोघांची मनं पुन्हा एकदा जुळू लागली.. आता व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर दोघांनीही पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
वांद्रयाच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचे अनेक खटले येतात.. त्यानंतर काऊंन्सेलिंगच्या माध्यमातून दुरावलेल्या मनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जातो.. यंदाही अशा रितीने एकत्र आलेल्या चार जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालयाचे प्रिन्सिपल न्यायाधीश, जपानच्या सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश खास पाहुणे उपस्थित होते.. जोडप्यांनी भांडण झाल्यावर संयम राखावा असा सल्ला यावेळी देण्यात आला.
आजच्या धावपळीच्या आणि हायटेक जमान्यात नातेसंबंध दुरावले चाललेत... त्यामुळं घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होतेय.. मात्र सामंजस्य आणि संयमाने विकोपाला जाणारे वाद मिटवता येतात.. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी दुरावलेली मनं एकत्र आणण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा हा संदेश नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 15, 2014, 10:38