भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू..., sudhir mungantiwar again bjp leader for maharashtra

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू...

भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरू...
www.24taas.com, मुंबई

भाजप अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्यात नितीन गडकरींना अपयश आल्यानंतर महाराष्ट्र भाजपमधली समीकरणंही बदललीत. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी एक महत्त्वाची बैठक विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी पार पडतेय.

भाजप कोअर कमिटीच्या या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आणि एकनाथ खडसे यांची नावे शर्यतीत आहेत. गेल्या महिन्यापर्यंत शक्तीशाली असलेल्या गडकरी गटाला आता गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आव्हान दिलं जाऊ लागलंय. त्यामुळेच गडकरींप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचीही दुसरी टर्म निश्चित असल्याचं वाटत असताना नव्या नियुक्तीसाठी मोर्चे बांधणी सुरु झालीय.

पुढच्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाचा फैसला होणार असल्यानं आता मुनगंटीवार यांच्या नावाला पर्याय म्हणून विदर्भातील तरुण आमदार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांची नावं पुढे येऊ लागलीत तर राज्यातले भाजपचे बडे प्रस्थ गोपीनाथ मुंडेंचे नावही प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आलंय. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड होणाऱ्या नेत्यासमोर अनेक आव्हानं असतील.

First Published: Tuesday, February 5, 2013, 14:47


comments powered by Disqus