आमदार निवासात तरूणीची आत्महत्या , Suicide In MAL House

आमदार निवासात तरूणीची आत्महत्या

आमदार निवासात तरूणीची आत्महत्या
www.24taas.com,मुंबई

मुंबईतील ‘मनोरा’या आमदार निवासात एका २७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची बाब रविवारी उघड झाली. सोलापूरचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या निवासात तिने आत्महत्या केल्याते समजते. रूपाली अंधारे, असे या बेरोजगार तरुणीचे नाव आहे.

रूपाली सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते. नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यात तिने आत्महत्या केल्याचे पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांचे म्हणणे आहे. कफपरेड पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रूपाली मुंबईमध्ये नोकरी शोधात आली होती. तिने कला शाखेमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

आमदार निवासात राहत असलेल्या शिंदे यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ती आली होती. मात्र नोकरी न लागल्याने ती निराश झाली होती. या नैराश्यातच रूपालीने काल रात्री पंख्याला दोरीने गळफास घेतल्याचे बोलले जात आहे. आमदार शिंदे याचे स्वीय सहाय्यक यांच्यासोबत ती राहत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे आहेत. आत्महत्येबाबत कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, आमदार शिंदे यांच्या खोलीत रूपाली कधी आणि कशासाठी आली होती याबाबत मात्र अधिक माहिती समजलेली नाही. रूपाली हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटी रूग्णालयात पाठविण्यात आला.

First Published: Tuesday, September 18, 2012, 10:50


comments powered by Disqus