राज ठाकरेंच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत, supriya sule twit on raj thackeray decision

राज ठाकरेंच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत

राज ठाकरेंच्या निर्णयाचं सुप्रिया सुळेंकडून स्वागत


www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`येत्या विधानसभा निवडणूकीत हा राज ठाकरे स्वत: निवडणूक लढविणार आहे आणि लोकांनी कौल दिला तर सत्तेचं नेतृत्वही राज ठाकरेच करेन` असं म्हणत राज ठाकरेंनी राजकीय वर्तुळात `ठाकरे बॉम्ब`च टाकलाय. राज ठाकरेंच्या या निर्णयाचं बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी स्वागतच केलंय.

`राज ठाकरे समोरून नेतृत्व करणार याचा आनंद झाला` असं सुप्रिया सुळे यांनी `ट्विटर` या सोशल वेबसाईटवर म्हटलंय.

महत्त्वाचं म्हणजे, राज ठाकरे यांच्या मुंबईत झालेल्या या सभेनंतर राजकीय वर्तुळातून आलेली सुप्रिया सुळे यांची ही पहिलीच प्रतिक्रिया आहे.




* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 31, 2014, 21:15


comments powered by Disqus