Last Updated: Wednesday, July 31, 2013, 12:35
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईमटकाकिंग सुरेश भगत हत्येप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आलं होतं. या सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेय. यात भगत याची पत्नी जया आणि मुलगा हितेश यांचाही समावेश आहे.
दोषी ठरलेल्या सहा जणांना सोमवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र, तारीख पुढे ढकलण्यात आली. जून २००८मध्ये सुरेश भगत अलिबागहून परतत असतांना वाटेत एका डंपरने त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये सुरेश भगतसह सात जणांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायावर कब्जा करण्यासाठी भगत याची हत्या मुलाने आणि पत्नीने केल्याचा आरोप, त्यानंतर करण्यात आला होता.
जया भगत, हितेश भगत, किरण आमटे, प्रवीण शेट्टी, सुहास रोगे,हरिश मांडवेकर यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईतील मटका किंग सुरेश भगत याचा कोट्यवधीचा मटक्याचा धंदा हा़डप करण्यासाठी त्याची पत्नी जया, मुलगा हितेश आणि सुहास रोगे यांनी सुरेश भगतच्या हत्येचा कट आखला होता. त्यासाठी त्य़ांनी किरण आमटे, हरिश मांडवेकर आणि प्रवीण शेट्टीला सुपारी दिली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 31, 2013, 12:16