Last Updated: Sunday, September 2, 2012, 22:05
www.24ttas.com,मुंबईलोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या आणि भारतीय जनता पक्षा नेत्या सुषमा स्वराज यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपने पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. या गोंधळामुळे गेल्या काही दिवसांपासून संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांमधील ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भेटीत सुषमा स्वराज यांनी कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणावरून सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात संसदेतील गोंधळासंदर्भात या चर्चा केल्याचे समजते.
First Published: Sunday, September 2, 2012, 22:05