Last Updated: Tuesday, December 31, 2013, 20:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. गेल्या साडे चार वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अध्यक्षपदाच्या नियुक्तीबरोबरच आयोगावर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. यात किशोरी वाघ, आशाबाई निरगे, आशाताई भिसे, ज्योत्स्ना विसपुते, विजया बागडे आणि उषा कांबळे यांचा समावेश आहे.
सुशीबेन शहा या मुंबई महिला काँग्रेस आघाडीच्या उपाध्यक्षा असून त्यांचं बीए एलएलबीपर्यंत शिक्षण झालंय. त्या गेल्या २४ वर्षांपासून त्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत. सुशीबेन शहा या काँग्रेसचे माजी मंत्री बी. ए. देसाई यांच्या कन्या आहेत.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदापदी ३१ डिसेंबरपर्यंत नियुक्ती करा असे कोर्टानं स्पष्ट आदेश दिले होते, त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतलाय. मागील साडेचार वर्ष रिक्त असलेल्या या पदावरील नियुक्तीसाठी मागील दीड वर्षापासून अनेकदा मागणी झाली. प्रसंगी आंदोलनंही करण्यात आली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, December 31, 2013, 20:14